लोणी काळभोर - दुसरे वडील घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने आलेल्या हालाकीच्या परिस्थितीचा फायदा उठवून अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सहा महिने कालावधीत वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध ठेवून सदर बाब कोणास सांगितली तर आईसह मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मूर्तिकारास अटक करण्यात आली आहे. १५ वर्षे वयाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी रूपेश अनंत उघडे (वय ३०, मूळ रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) याचेवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१७ मध्ये सदर पीडित मुलीचे दुसरे वडील सोरतापवाडी येथे रूपेश उघडे याचे मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात कामाला होते. त्यामुळे मुलगी डबा घेऊन कारखान्यात जात असे. तसेच उघडे हा तिच्या वडिलासमवेत सतत घरी जात होता. त्या वेळी तो मुलीशी बोलत होता. वडील तिला वारंवार मारहाण करत या कारणांवरून उघडे त्याला रागवत असे. जानेवारी २०१८मध्ये वडील घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने त्यांची परिस्थिती हालाकीची झाली. हे लक्षात आल्यानंतर रूपेश उघडेने तुला मी पत्नीप्रमाणे ठेवतो, तुझ्या आईचाही सांभाळ करतो असे सांगून एका खोलीत नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:17 AM