नवी दिल्ली - फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याला आज दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयात एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोर्टासमोर हजर करण्यात आलं होते. एनआयएने कोर्टात काश्मीर घाटीतील दगडफेक प्रकरणी फुटीरतावादी नेत मसरत आलम भट, शब्बीर शाह व आसिया अंद्राबी यांच्या चौकशीसाठी त्यांना १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने या तिन्ही नेत्यांना दहा दिवसांसाठी एनआयएकडे सोपवण्यास मुभा दिली.
मसरत आलमवर जवानांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या दगडफेकीत काही जवानांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच मसरतवर प्रक्षोभक भाषण केल्याचाही आरोप आहे. मसरतला २०१५ मध्ये अनेक प्रयत्नानंतर अटक करण्यात आली आहे. गिलानीचा जवळचा मानला जाणाऱ्या मसरत आलमवर तब्बल दहा लाखांच इनाम ठेवण्यात आले होते.