२००८ साली झालेल्या अमरोहा हत्याकांडातील मुख्य आरोपी शबनम आणि सलीम तुरूंगात आहेत. दोघांना फाशीची शिक्षाही सुनावली गेली आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, ६ लोकांची हत्या करणाऱ्या सलीमला तुरूंगात कशाचीच चिंता किंवा काळजी नाही. तो म्हणाला की, साहेब का परेशान होताय! इतक्या लवकर फाशी-वाशी नाही होणार. इथे इतक्या सहजपणे फाशी होत नाही. आता अजून बरेच वर्ष लागतील. खूप पर्याय आहेत आपल्याकडे. दरम्यान, सलीमने प्रेयसी शबनमच्या सांगण्यावरून तिच्या घरातील सात लोकांची हत्या केली होती.
एका वेबसाइटनुसार, सलीम आजही इतर कैद्यांना त्याच गोष्टी सांगतो. असे सांगितले जात आहे की, २०२० च्या नोव्हेंबरमध्ये दया याचिका अर्जावर साइन करण्यासाठी त्याला नैनी तरूंगातून ऑफिसमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे जेव्हा एक पोलीस अधिकारी त्याला म्हणाले की, तू आता फाशीपासून वाचू शकत नाही. तर तो म्हणाला की, साहेब इथे वाचण्याचे अनेक पर्याय आहे. फाशी होईपर्यंत अनेक वर्ष असेच जातील. साहेब तुम्ही परेशान होऊ नका. इथे इतक्या लवकर काही होत नसतं.
तुरूंगात बसून शायरी लिहितो सलीम
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शबनमची दया याचिका फेटाळली होती तेव्हा सलीमला धक्का बसला होता. पण फाशीची तारीख पुढे जाताच. सलीम आनंदी झाला. तो आता तुरूंगात बसून शायरी लिहितो.
शबनमच्या आठवणीत.....
मीडिया रिपोर्टनुसार, वरिष्ठ तुरूंग अधिक्षक पीएन पांडे यांनी माहिती दिली होती की, ७ लोकांच्या हत्येचा सलीमला ना आधी पश्चाताप होता ना आज आहे. पण इतक्या वर्षात तो असं काही वागला नाही ज्याने दुसऱ्याला त्रास होईल. दुसऱ्यांसोबत तो चांगला वागतो. साथीदारांची मदत करतो आणि पाच वेळा नमाजही करतो. मात्र, अलिकडे त्याला शबनमची खूप आठवण येते.
फर्नीचर बनवण्याचं ट्रेनिंग
२०१८ पर्यंत सलीम बरेलीच्या तुरूंगात बंद होता आणि नंतर २७ सप्टेंबर २०१८ ला त्याला प्रयागराजच्या नैनी सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. कारण बरेलीच्या तुरूंगात फाशीची सुविधा नाही. पोलीस अधिकक्षकांनी सांगितले की, सलीम एक चांगला कारागीर आहे. तुरूंगातच त्याने लाकडाचं काम शिकलं. त्याने चांगले फर्नीचर तयार केले आहेत.