मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गुरुवारी जामीन मिळाला. मात्र, जामीनासोबतच न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी 14 अटीही घातल्या आहेत. या निर्बंधांनंतर आर्यनचे आयुष्य आता पूर्वीप्रमाणे सामान्य राहणार नाही. आर्यनसोबतच मुनमुन धमिचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला आहे. मात्र, निर्धारित वेळेत सुटकेचे आदेश कारागृहात पोहोचू न शकल्याने शुक्रवारी त्यांची सुटका होऊ शकली नाही.
न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. त्याला त्यांचा पासपोर्ट एनडीपीएस कोर्टाकडे सोपवावा लागेल. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरीही लावावी लागणार आहे.
जुही चावलाने भरला आर्यनचा 'बेल बॉन्ड' -बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने शुक्रवारी आर्यनसाठी जामीनपत्र भरले. ती आर्यनसाठी सत्र न्यायालयात पोहोचली आणि तिने त्याच्यासाठी जामीन दार होण्यासंदर्भात भाष्य केले. जुहीच्या वतीने वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टाला सांगितले की, पासपोर्टवर त्यांचे नाव आहे आणि त्यांचे आधार कार्डदेखील जोडण्यात आले आहे. त्या आर्यन खानसाठी श्योरिटी देत आहेत. त्या आर्यनच्या वडिलांच्या व्यावसायिक सहकारी आहेत आणि आर्यनला त्याच्या जन्मापासून ओळखतात. यानंतर न्यायमूर्तींनी जुहीच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि आर्यनचा जामिन जारी केला.
न्यायालयाने आर्यनला घातल्या 'या' 14 अटी -1. आर्यनच्या वतीने 1 लाखांचा पर्सनल बाँड जमा करावा लागेल.2. किमान एक अथवा त्याहून अधिक जामीनदार द्यावे लागतील.3. NDPS न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही.4. तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडता येणार नाही.5. ड्रग्ससारख्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीत सापडल्यास तत्काळ जामीन रद्द केला जाईल. 6. या प्रकरणासंदर्भात मीडिया अथवा सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची वाच्चता करू नये.7. दर शुक्रवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कार्यालयात सकाळी 11 ते दोपारी 2 वाजेदरम्यान यावे लागेल.8. खटल्याच्या नियोजित तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल.9. कुठल्याही वेळी बोलावल्यानंतर एनसीबी कार्यालयात जावे लागणार.10. प्रकरणातील इतर आरोपी अथवा व्यक्तींसोबत संपर्क अथवा बोलता येणार नाही.11. एकदा ट्रायल सुरू झाल्यानंतर यात कुठल्याही प्रकारचा विलंब करणार नाही.12. आरोपी असे कुठलेही कृत्य करणार नाही, ज्यामुळे कोर्टाच्या कार्यवाहीवर अथवा आदेशांवर विपरीत परिणाम होईल.13. आरोपी वैयक्तिकरित्या अथवा इतर कुणाकडूनही साक्षीदारांना धमकावण्याचा, त्यांना प्रभावित करण्याचा किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही.14. जर अर्जदाराने/आरोपीने यांपैकी कुठलाही नियम मोडला तर, त्याचा जमीन रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा NCB कडे अधिकार आहे. NCB न्यायालयात जाऊ शकते.हेही वाचा -- ... म्हणून जामीन मिळूनही आर्यनची आजची रात्र देखील आर्थर रोड जेलमध्येच- कोण आहेत आर्यन खानला जामीन मिळवून देणारे वकील मुकुल रोहतगी? एका सुनावणीसाठी किती घेतात फी?