केरळची वादग्रस्त समाजसेविका रेहाना फातिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. रेहानावर आरोप आहे की, तिने आपल्या अल्पवयीन मुलांसमोर अर्धनग्न शरीरावर पेंटिंग बनविली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली, त्यानंतर पोलिसांनी रेहानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता बऱ्याच दिवसांनी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रेहाना आज सायंकाळी एर्नाकुलम साऊथ पोलीस ठाण्यात सरेंडर झाली आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते एवी अरुण प्रकाश यांनी तिरुवाला पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा व्हिडिओ फातिमा यांनी 'बॉडी अँड पॉलिटिक्स' या नावाने पोस्ट केला होता, पाहता पाहता तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. दरम्यान, केरळच्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने 10 दिवसात पतनमतिट्टा जिल्हा पोलिस प्रमुखांकडून या संदर्भात अहवाल मागविला होता. २०१८ मध्ये सबरीमाला येथील भगवान अयप्पाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील फातिमा चर्चेचा विषय बनली होती, त्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यावेळेची हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्याचा देखील आरोप होता. बर्याचदा वादात येणाऱ्या फातिमा यांनी २०१४ मध्ये कोची येथे मॉरल पोलिसिंगविरूद्ध ‘किस ऑफ लव’ मोहिमेमध्येही भाग घेतला होता. फातिमाच्या जोडीदाराने सोशल मीडियावर किसची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती, त्यामुळे बरीच खळबळ उडाली होती.रेहाना फातिमा यांनी शरीरावर पेंटिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता आणि लोक फातिमा यांना अटक करण्याची मागणी केली होती. रेहानाने एका नावाच्या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती तिचा नवरा मनोज के श्रीधर यांनी केली होती. इंटरसेक्सुअलिटीच्या थीमवर रेहानाने या चित्रपटात अनेक नग्न आणि बोल्ड सीन दिले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा
Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग
भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी
Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड