शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Amravati Crime News: शेमफुल! वहिनी, वहिनी म्हणून केला विश्वासघात; शरीरसंबंधांचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर केला व्हायरल

By प्रदीप भाकरे | Published: March 12, 2023 1:13 PM

विवाहित महिलेवर वारंवार अतिप्रसंग. आरोपी व ३६ वर्षीय पिडिता हे परस्परांचे ओळखीचे होते. त्यातून त्यांच्यात परिचय व संवाद देखील होता.

प्रदीप भाकरेअमरावती : एका विवाहित महिलेला प्रेमजाळयात ओढून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने त्या क्षणाचा व्हिडिओ बनवून तो इंटरनेटवर व्हायरल केला. ही बाब कळताच विवाहितेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरूध्द तक्रार नोंदविली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी ११ मार्च रोजी रात्री ८.३४ मिनिटांनी आरोपी किरण काशिनाथ गजभिये (२९, जळू) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी व ३६ वर्षीय पिडिता हे परस्परांचे ओळखीचे होते. त्यातून त्यांच्यात परिचय व संवाद देखील होता. तो तिच्या घरी येजा करायचा. अशातच, जानेवारी २०२० मध्ये त्याने ‘वहिनी, तुम्ही मला खुप आवडता, अशी गुगली फेकली. विवाहितेचा पती हा मद्यपी असल्याने ती देखील आरोपीकडे आकर्षित झाली होती. त्याचदरम्यान आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या क्षणाचा त्याने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. ते समजताच तो व्हिडिओ डिलिट करण्याची विनंती पिडिताने त्याला केली. मात्र, तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याच्याआड तिचे अनेकदा सर्वस्व लुटले.सोशल मिडियावर बदनामीआरोपीने त्याच्याकडे असलेल्या व्हिडिओची धमकी देऊन विवाहितेशी वारंवार बळजबरी केली. मात्र अलिकडे त्याने तो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यासोबतच इंटरनेटवर अपलोड करून व्हायरल केला. काही परिचयातील व्यक्तींनी तो प्रकार पिडिताच्या लक्षात आणून दिला. त्या सोशल व्हायरलमुळे पिडिताची सामाजिक बदनामी झाली. त्यामुळे ११ मार्च रोजी रात्री तिने लोणी पोलीस ठाणे गाठले.

३६ वर्षीय पिडिताच्या तक्रारीवरून ११ मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल केला. गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयासमक्ष हजर केले. - मिलिंदकुमार दवणे, ठाणेदार, लोणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग