- नितीन पंडित भिवंडी - भिवंडी शहरात वाहन चोरी,मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असताना शांतीनगर पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळत ११ दुचाकी २३ मोबाईल व दोन सोनसाखळी चोरी अशा १६ गुन्ह्यांची उकल करीत ८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेच चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वाढत्या वाहन चोरी मोबाईल चोरी व मंगळसूत्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची वेगवेगळी पथके वाहन या गुन्हयाचा तपस करीत होती या पोलीस पथकात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,विक्रम मोहिते,निलेश बडाख,सपोनि शैलेंद्र म्हात्रे,पो उपनिरी निलेश जाधव,भोलासो शेळके व पोलीस कर्मचारी रवींद्र चौधरी,महेश चौधरी,तुषार वडे,रिजवान सैयद,प्रसाद काकड,श्रीकांत पाटील,किरण जाधव,किरण मोहीते,संजय पाटील,सचिन सांयखिडीकर,अमोल इंगळे,रविद्र पाटील,दीपक सानप या पथकाने सापळा रचून सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे वय २० वर्ष रा.लहुजीनगर,कल्याण,आयाज अली रेहमतअली अन्सारी वय ३८ रा.चिरागनगर घाटकोपर, दाऊद शोएब अन्सारी वय २८ रा गुलजार नगर भिवंडी,सर्फराज रेहमतअली खान वय २६ रा.भिवंडी या चार जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून ११ दुचाकी ,१ रिक्षा, दोन सोन्याच्या चैन व २३ चोरीचे मोबाईल असा एकूण ८ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत शांतीनगर येथील १३,शहर पोलीस ठाण्यातील २,नारपोली पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण १६ चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मोबाईल चोरीतील २३ मोबाईल हे सर्फराज रेहमतअली खान हा नेपाळ येथे विक्री साठी पाठविणार असल्याची खबर गुप्त बातमीदारा मार्फत शांतीनगर पोलिसांना मिळाली असता तातडीने कारवाई करीत सर्फराज रेहमतअली खान याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यामुळे हा मुद्देमाल हस्तगत करता आला.विशेष म्हणजे चोरटे आपल्या मौज मजेसाठी देखील वाहन व मोबाईलची चोरी करत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.