शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

‘ती’ गायब, मग इन्स्टाग्राम फॉलोअर्स कसे वाढताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 6:31 AM

‘ती’ गायब, मग इन्स्टाग्राम फॉलोअर्स कसे वाढताहेत?

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : स्वदिच्छा साने गायब झाली असली, तरी तिच्या खासगी इन्स्टाग्राम अकाउंटमधील फॉलोअर्स मात्र वाढत आहेत. त्यामुळे हे अकाउंट नेमके कोण ऑपरेट करत आहे याची चौकशी पोलिसांनी करावी. त्यातूनच हे गूढ उकलेल, असे बॅण्ड स्टॅंड येथील जीवरक्षक मिथू सिंह याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

बेपत्ता झालेली विद्यार्थीनी स्वादिच्छा साने
सिंह याने केलेल्या दाव्यानुसार, २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास त्याने स्वदिच्छाला बॅण्ड स्टॅंडच्या गणेशनगर रहिवासी संघ परिसरातील किनाऱ्यावरील खडकावर फिरताना पाहिले. प्रियकर, कुटुंबीय, तसेच तिच्या डॉक्टरी पेशाबाबत बऱ्याच गप्पा मारल्यानंतर, तिने स्वतः तिचे खासगी इन्स्टाग्राम खाते आपल्याशी शेअर केल्याचा दावा सिंहने केला. पहाटे चारच्या सुमारास ओहोटी आल्यावर मला आत्मचिंतन करायचे आहे, तुम्ही जा, असे तिने सांगितल्यावर तो खडकावरून निघून गेला. त्यानंतर त्याचा भाचा जुगेश पोलिसांना घेऊन आला, तेव्हा ती हरवली असल्याचे त्यांना समजले.
एमबीबीएस विद्यार्थीनी बँडस्टॅडच्या या जागी अखेरची पाहिली गेली
या दरम्यान, स्वदिच्छाच्या खासगी अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या वाढत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. हे खाते खासगी असेल तर जोपर्यंत खातेधारक एखादी रिक्वेस्ट मान्य करत नाही, तोपर्यंत ते खाते कोणालाही पाहता येत नाही. त्यामुळे हे खाते स्वदिच्छा किंवा तिच्या जवळचीच एखादी व्यक्ती ते हाताळत आहे. त्यामुळे पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले, तर तिच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ सहज उकलेल, असेही मिथू सिंह याचे म्हणणे असून ती आत्महत्या करणे शक्य नसल्याचेही त्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्राम