शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

Sheena Bora Murder Case, Indrani Mukherjee: आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, इंद्राणीच्या मुलीची विशेष न्यायालयाला विनंती

By दीप्ती देशमुख | Published: September 14, 2022 6:44 PM

या विनंतीवर कोर्टाने काय निर्णय दिला.. वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, अशी तोंडी विनंती शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाला केली. काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयाने विधीला इंद्राणीबरोबर राहण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयाला ही विनंती केली. न्यायालयाने फेटाळलेल्या अर्जात विधीने म्हटले होते की, आईला २०१५ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा आपण अल्पवयीन होतो. गेली सात वर्षे आईच्या प्रेमापासून, सहवास आणि जिव्हाळ्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात इंद्राणीची जामिनावर सुटका करताना तिला कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क न साधण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली होती, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने विधीचा आईबरोबर राहण्यास परवानगी मागणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला. शीना बोरा हत्येप्रकरणी २०१५ मध्ये सीबीआयने विधीचा जबाब नोंदविला आहे.

'विधी भारतात आली आहे. ती तिच्या आईला भेटली नाही. ती आईला किमान मिठी तरी मारू शकते का?' अशी विचारणा विधीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर म्हणाले की, इंद्राणीला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे मी अशा विनंतीला परवानगी देऊ शकत नाही किंवा नाकारू शकत नाही,' असे न्यायालयाने म्हटले.

विधी तिच्या आईला केवळ मिठी मारेल, तिच्याशी काही बोलणार नाही, असे विधीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. विधी ही इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांची मुलगी आहे. पीटर मुखर्जीच्या आधी इंद्राणीचा संजीव खन्नाबरोबर विवाह झाला होता.  संजीव खन्नाही शीना बोरा हत्येप्रकरणात आरोपी आहे.

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीMumbaiमुंबईCourtन्यायालय