Breaking : शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला मुंबई हायकोर्टाने केला जामीन मंजूर, मात्र ६ आठवड्यांची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 16:11 IST2020-02-06T16:10:04+5:302020-02-06T16:11:23+5:30
2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीटरची सुटका करण्यात आली आहे.

Breaking : शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला मुंबई हायकोर्टाने केला जामीन मंजूर, मात्र ६ आठवड्यांची स्थगिती
मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या चार वर्षांपासून पीटर तुरुंगात आहेत. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीटरची सुटका करण्यात आली आहे. तसेच पीटर तुरुंगात असल्यापासून पीटरची प्रकृती ठीक नाही आहे.
सीबीआयने जामिनाच्या निर्णयाला विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी निर्णयाला ६ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला तब्ब्ल चार वर्षानंतर दिलासा मिळाला आहे. प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र, कोर्टाच्या परवानगीविना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
इंद्राणी, पीटर मुखर्जी झाले विभक्त, कुुटुंब न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट
पीटर मुखर्जीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यास हायकोर्टाची परवानगी
Sheena Bora case: Bombay High Court has stayed the order for 6 weeks on CBI's request, so that it can file an appeal in the Supreme Court. https://t.co/odCk2gDPZG
— ANI (@ANI) February 6, 2020
शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास 2016 साली विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला होता. केस डायरीत नमूद करण्यात आलेल्या बाबी लक्षात घेत विशेष महिला न्यायालयाच्या न्या. एच. एस. महाजन यांनी जामीन अर्ज फेटाळला होता.
‘शीनाचा मृतदेह पुरण्यापूर्वी इंद्राणी आणि पीटरमध्ये मोबाईलद्वारे १५ मिनिटे संभाषण झाले. पीटरचे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. त्याने शीनाला शोधण्यासाठी राहुलला मदत का केली नाही. त्याने पोलिसांना सहकार्य करण्यास का सांगितले नाही?’ असा प्रश्न सीबीआयच्या वकिलांनी केला. इंद्राणी तिचा माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांना ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती.