मुंबई - काही वर्षांपूर्वी गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडामधील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तिची मुलगी शीना बोरा ही जिवंत आहे आणि ती काश्मीरमध्ये आहे, असा दावा इंद्राणी मुखर्जीने केला आहे. तिने हा दावा सीबीआयच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रामधून हा दावा केला आहे.
सीबीआयला लिहिलेल्या पत्रामध्ये इंद्राणी मुकर्जी लिहिते की, हल्लीच तुरुंगामध्ये तिची भेट एका महिलेशी झाली. तिने मला सांगितले की, ती काश्मीरमध्ये शीना बोरा हिला भेटली होती. त्यामुळे सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोरा हिचा शोध घेतला पाहिजे, असे इंद्राणी मुखर्जीने या पत्रात म्हटले आहे.शीना बोरा हिची हत्या २०१२ मध्ये झाली होती. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी हिला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. इंद्राणी मुखर्जी ही २०१५ पासून मुंबईतील भायखळा तुरुंगामध्ये आहे. तिचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने गेल्या वर्षी फेटाळून लावला होता. आता इंद्राणी मुखर्जी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.
इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बंदुकीसह अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये शीना बोराच्या हत्येचा उलगडा झाला होता. चौकशीमध्ये त्याने एका अन्य गुन्ह्यातही आपला सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्याने पोलिसांना सांगितले होते की, २०१२ मध्ये इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोराचा गळा आवळून खून केला होता. इंद्राणी आणि शीना ही तिची बहीण असल्याचे सांगत होती. पुढच्या तपासामध्ये शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची पहिली मुलगी होती. तसेच ती मुंबईमध्ये घर घेऊन द्यावे, यासाठी आईला ब्लॅकमेल करत होती.
दरम्यान, २०१५ मध्ये हे प्रकरण समोर आले आणि इंद्राणी हिने मुंबईतील वांद्रे येथे शीनाचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यात पुरल्याचे उघड झाले होते. त्यानंतर शीना हिच्या मृतदेहाचे अवशेष शीना बोरा हिला मिळाले होते. मात्र इंद्राणी मुखर्जीने हा दावा फेटाळा होता.