मुंबई - शीना बोरा हत्याकांडात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्राणीची वकील सना रईस खान यांनी दावा केला आहे की, सरकारी अधिकाऱ्याने शीना बोराला यावर्षी श्रीनगरमध्ये पाहिले होते. तिने तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सांगितले की, ती २०२१ मध्ये श्रीनगरमध्ये शीनाला भेटली होती. इंद्राणीने सीबीआयला पत्र लिहून आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास मी न्यायालयात अर्ज करेन, असे इंद्राणीने सांगितले.
शीना बाेरा जिंवत असून ती काश्मीरमध्ये आहे, असा खळबळजनक दावा शीनाच्या हत्येत आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला दिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून, ही महिला काश्मीरमध्ये शीना बोराला पाहिल्याचे सांगते, तिथे तिचा शोध घ्यावा असे तिने पत्रात म्हटले आहे. कोण आहे शीना बोरा आणि तिची हत्या कधी झाली ?
शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी च्या पहिल्या पतीची मुलगी होती. जिची २४ एप्रिल २०१२ रोजी गळा आवळून हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. २०१५ मध्ये ही बाब समोर आली होती. सावत्र भावासोबतचे प्रेमसंबंध आणि संपत्तीच्या वादातून शीना बोराची हत्या करण्यात आली होती. वास्तविक पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव राहुल आहे, ज्याच्यासोबत शीनाचे अफेअर होते. यामुळे इंद्राणी आणि पीटर दोघेही नाराज होते.खून कसा झाला?२०१२ मध्ये हे हत्याकांड घडवण्यात आले होते. शीना अभ्यासासाठी अमेरिकेला गेली आहे, असे दोन वर्षे सर्वांनाच वाटत राहिले. मात्र, २०१५ मध्ये पोलिसांना शीनाची हत्या झाल्याची माहिती मिळाली. इंद्राणी मुखर्जीने तिचा ड्रायव्हर श्याम मनोहर राय आणि अन्य एका व्यक्तीच्या मदतीने शीनाची हत्या केली होती.
* शीना इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करत होती, असे तपासात समोर आले. * शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. * राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेल्याचे सांगण्यात आले.
* २०१५मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले होते.
* पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटविल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
* या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून सीबीआयने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. गेल्यावर्षी त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.