हिमाचल प्रदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने चंदीगड शहरात महाविद्यालयीन शिक्षण आणि प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी येतात. काही जण ग्लॅमर पाहून भरकटतात, तर काही त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. जे भरकटतात, ते अशा मार्गावर जातात, ज्याचा मार्ग तुरुंगात जातो. असाच एक प्रकार चंदीगड उघडकीस आला असून त्यात हिमाचल प्रदेशातील दोन तरुणांना पोलिसांनी चरस तस्करी करताना अटक केली आहे. हे आरोपी एका कारमधून ड्रग्स पुरवण्यासाठी जात होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
हे दोन्ही आरोपी गर्लफ्रेंड, डिस्कोथेकवर खर्च करण्यासाठी आणि लक्झरी लाइफ जगण्यासाठी ड्रग्सची तस्करी करायचे. आरोपींपैकी एकाने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून त्याचे वडील सीआयएसएफमधून इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त झाले आहेत. एका आरोपीचे नाव आशिष ठाकूर असे आहे, तर दुसऱ्या आरोपीचे नाव सावन बोध आहे. यापूर्वीही मोहाली पोलिसांनी पकडलेला आशिष जामिनावर बाहेर आला आहे. त्याचे वडील सीआयएसएफमध्ये इन्स्पेक्टर पदावरून निवृत्त झाले आहेत. खुनाच्या गुन्ह्यातही आरोपी करण्यात आले आहे.
ट्रायसिटीमध्ये 11 वर्षांपासून ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या आशिषने स्वामी देवी दयाळ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, बरवाला येथून B.Tech Electronics ची पदवी प्राप्त केली आहे. चंदीगडचे एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितले की, जिल्हा गुन्हे शाखेचे डीएसपी डॉ. विकास श्योकंद यांच्या देखरेखीखाली, निरीक्षक जसमिंदर यांच्या नेतृत्वाखाली एसआय राजेश कुमार यांच्या पथकाने आयटी पार्क परिसरातील पशुवैद्यकीय रुग्णालय रोडवर नाकाबंदी करून आरोपीला पकडले. आरोपी आशिष हा हिमाचल नंबर प्लेट असलेल्या काळ्या रंगाच्या कारमध्ये जात होता.
पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अटक करण्यात आली. आरोपी आशिष ठाकूरच्या गाडीत 173.16 ग्रॅम चरस आढळून आला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी सहआरोपी सावन बोध याला अटक केली असून तो हिमाचलमधून चरसचा पुरवठा करत होता. चरस विकण्यासाठी तो यापूर्वी चार वेळा खासगी वाहनाने आला आहे. आरोपी सावन विरुद्ध कुल्लू येथील भुंतर पोलीस ठाण्यात 2021 साली खुनाच्या प्रयत्नांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.