हिमाचल प्रदेशच्या शिमला पोलिसांनी गुरूवारी रात्री उशीरा एका विदेशी महिलेला ड्रग्ससोबत अटक केली. २४ तासात शिमला पोलिसांनी दोन परदेशीर नागरिकांना पकडलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अनेक आश्चर्यजनक खुलासे झाले आहेत. हे संपूर्ण ऑपरेशन एसपी प्रवीर ठाकूर यांनी लीड केलं.
एएसएसपी प्रवीर ठाकूर यांनी सांगितले की, कॅमरूनची राहणारी ४१ वर्षीय महिलेने पोलिसांना साधारण ८ तास चांगलाच चकमा दिला. ही महिला कंडोममध्ये २०६ ग्रॅम ड्रग्स लपवून घेऊन आली होती. हे ड्रग्सती दिल्लीहून घेऊन आली होती. तिच्या प्लॅननुसार महिलेने लोकांना लिफ्ट मागणं सुरू केलं.
शिमल्याला पोहोचेपर्यंत तिने वेगवेगळ्या लोकांना लिफ्ट मागितली. महिला इतकी हुशार होती की, शिमल्यात ज्यांना पार्सल द्यायचं होतं त्यांना ती ज्यांना लिफ्ट मागितली त्यांच्या फोनवरून फोन करत होती. पोलिसांना तिचं लोकेशन समजलं तेव्हा पोलिसांनी रस्त्यावर बंदोबस्त वाढवला. त्यानंतर ती पुन्हा शिमल्याकडे जाऊ लागली. पोलिसांना शंका आहे की, महिलेने सोलन भागात ड्रग्स पोहोचवलं. (हे पण वाचा : फार्महाऊसवरील 'डान्स पार्टी' भोवली; पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई )
शिमल्याहून परतताना महिलेने अप्पर शिमल्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला लिफ्ट मागितली. या महिलेच्या कनेक्शनबाबत ड्रग्स प्रकरणी पकडण्यात आलेल्या रिपब्लिक ऑफ कांगोच्या राहणाऱ्या एका विद्यार्थ्याकडून समजले होते. हा मुलगा शिमल्यातील एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. या महिलेने या मुलाला एक फोन केला होता. त्याच्यासोबत २ हजार रूपये प्रति ग्रॅम ड्रग्सची डील झाली होती. (हे पण वाचा : १५ व्या वर्षीच 'ती' बनली गर्भवती; आरोपी म्हणतो, "कुछ नही होता. मै शादी करूंगा..!")
जशी महिला शोघी भागात पोहोचली पोलिसांनी तिला अटक केली. आरोपी महिलेकडून ड्रग्ससोबतच ३८ हजार ७५० रूपये कॅश ताब्यात घेण्यात आली. पकडली गेल्यावर महिलेने चांगलीच नौटंकी केली. कधी भाषा न येण्याचं खोटं कारण दिलं तर कधी कुटुंबासाठी सोडा असं म्हणू लागली. पोलिसांनी हिसका दाखवला तेव्हा ती थेट हिंदीत बोलू लागली. चौकशीतून समोर आलं की, महिला बऱ्याच महिन्यांपासून शिमल्यात राहते आणि ३० स्थानिक लोकांच्या संपर्कात आहे.