उत्तर प्रदेश एक असं राज्य आहे जेथून गुन्हे विश्वातील सर्वात जास्त आणि सर्वात विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. येथील मेरठमधील नौचंदी पोलीस स्टेशन तर नेहमीच चर्चेत असतं. याचं कारण म्हणजे एसएचओ प्रेमचंद शर्मा यांचं वागणं. प्रेमचंद शर्मा हे याआधी तक्रारदाराला चंदनाचा टीळा लावल्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर होळीला पीडित व्यक्तीला गंगाजल देण्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा त्यांचा एक कारनामा समोर आला आहे. हे कारनामे असे आहेत जणू वाटतं की, हे पोलीस स्टेशनचे अधिकारी नाही तर मंदिराचे पुजारी आहेत.
एसएचओ प्रेमचंदवर आरोप आहे की, एका कौटुंबिक वादात त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पीडित व्यक्तीला गायत्र मंत्राचा जाप करण्यास सांगितले. तसेच हरिद्वारला जा, टीळा लावत जात असा सल्ला दिला. इतकेच नाही तर त्यांनी पीडित व्यक्तीला स्वत: गायत्री मंत्र लिहून दिला आणि १०८ वेळा गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितले.
यानंतर एसएचओची तक्रार घेऊन पीडित व्यक्ती वकिलासोबत मेरठच्या आयजी कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी न्यायाची मागणी केली. पीडित व्यक्तीच्या वकिलाने सांगितले की, आयजी साहेबांनी पीडित व्यक्तीची तक्रार लिहून घेतली.शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय हेमंत गोयलचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. हेमंत गोयलचा आरोप आहे की, ते एकटे राहत होते आणि त्यांच्या शेजारच्या महिलेने एका सविता नावाच्या महिलेसोबत त्यांची भेट करून दिली. तिचा घटस्फोट झाला होता आणि तिला एक १९ वर्षाचा मुलगा आहे.
हेमंत गोयलचा आरोप आहे की, त्यांची फसवणूक करून त्यांच्यासोबत महिलेने लग्न केलं. त्यांनीही वय बघता ऑक्टोबर २०२० मध्ये सवितासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. त्यांची पत्नी आणि सावत्र मुलगा त्यांना मारहाण करू लागले. तसेच पैशांसाठी दबाव टाकू लागले.
याचीच तक्रार घेऊन ते मेरठच्या नौचंदी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पण एसएचओ प्रेमचंद यांनी वेगळाच सल्ला दिला. हेमंत गोयल यांचा आरोप आहे की, नौचंदी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने त्यांची तक्रार लिहून घेण्याऐवजी, कायदेशीर कारवाई करण्याऐवजी शंख वाजवण्याचा, टीळा लावण्याचा, गंगाजल पिण्याचा आणि गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला. सोबतच हरिद्वारला जाऊन आश्रमात राहण्याचा सल्ला दिला.
हेमंत गोयलचे वकिल राम कुमार म्हणाले की, एसएचओमुळे हेमंत कुमारसोबत तीन वेळा मारहाण झाली आहे आणि तिसऱ्यांदा जेव्हा मारहाण झाल्यावर हेमंत गोयल तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा एसएचओने त्यांना गायत्री मंत्र लिहून दिला. आणि सांगितले की, १०८ वेळा याचा जप करा. सोबतच पूजा करण्यासही सांगितले.
तेच पीडित हेमंत गोयलने मीडियासमोर आपली अडचण सांगितली. ते म्हणाले की, त्यांची पत्नी आणि सावत्र मुलगा त्यांना मारहाण करतो. त्यांना घरातून काढण्यात आलं आहे. त्यांच्या घरावर कब्जा करण्यात आला आहे. ते म्हणाले की, त्यांचं लग्न सविता कौशिकसोबत जबरदस्ती लावण्यात आलं होतं. ते म्हणाले की, म्हातापणाचा सहारा म्हणून त्यांनीही हे लग्न केलं. हे प्रकरणाची तक्रार करण्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा त्यांनी गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, याने अडचणी दूर होतील.