पार्किंगच्या वादातून पोटच्या मुलावर रोखली बंदूक, दृश्य पाहून आईला आला हार्ट अटॅक
By पूनम अपराज | Published: January 1, 2021 03:57 PM2021-01-01T15:57:56+5:302021-01-01T15:59:16+5:30
Crime News : शोकांतिका म्हणजे या घटनेत एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांचा मुलावर पार्किंगच्या वादातून बंदूक रोखली.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका दुर्दैवी घटना घडली आहे. शोकांतिका म्हणजे या घटनेत एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांचा मुलावर पार्किंगच्या वादातून बंदूक रोखली. हे थरारक दृश्य पाहून तेथे असलेल्या मुलाच्या ५० वर्षीय आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
ते कसे घडले
दीपा असे मृताचे नाव असून ते बैरागड परिसरातील रहिवासी होती. एक वीरुमल आहुजा नावाचा व्यक्ती त्यांच्या शेजारील घरात राहतो. बुधवारी रात्री दीपाचा अल्पवयीन मुलगा (इयत्ता 9 वीचा विद्यार्थी आहे) आणि आहुजाचा जावई, मनिष ओचानी यांच्या घराच्या बाहेर गाडी पार्किंगवरून जोरदार वाद झाला. लवकरच आहूजा आणि त्याची मुलगी सोनल (ओचनीची पत्नी) देखील वादात सामील झाले.
गोंगाट ऐकून दीपा आणि तिचा नवरा घराबाहेर आले आणि वाद आणखी विकोपाला गेला. अचानक ओचनीने दीपाच्या मुलाकडे बंदूक दाखविली आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली. हे थरारक दृश्य पाहून दीपाला हृदयविकाराचा झटका आला आणि ती खाली कोसळली. तिला दोन रूग्णालयात नेण्यात आले पण दोन्ही ठिकाणी तिच्या उपचारासाठी सुविधा नसल्याचे सांगून तिला दाखल करण्यास नकार दिला.
त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने हमीदिया हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि आहुजा, त्याची मुलगी सोनल आणि तिचा नवरा ओचानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि दीपाचा मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात नमूद आहे.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोनलने दावा केला आहे की, तिच्या पतीने अल्पवयीन मुलाला जी बंदूक दाखविली होती ती एक खेळण्यातली बंदूक होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.