शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

Shocking! १५ दिवसांत ३ अभिनेत्रींची आत्महत्या, बंगाली सिनेसृष्टी हादरली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:39 PM

गेल्या १५ दिवसांत कोलकाता येथे ३ अभिनेत्रींचा मृत्यू झाला आहे. या घटनांनी बंगाली सिनेसृष्टी हादरली आहे.

नवी दिल्ली – बंगाली सिनेसृष्टीत आणखी एक खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. कोलकाता येथे आणखी एका मॉडेलनं आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली आहे. मंजूषा नियोगीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. अद्याप मंजूषाच्या मृत्यूचं कारण समजू शकलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बंगाली सिनेसृष्टीत काय चाललंय असा प्रश्न आता उभा राहू लागला आहे.

मागील ३ दिवसांत दुसऱ्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत कोलकाता येथे ३ अभिनेत्रींचा मृत्यू झाला आहे. या घटनांनी बंगाली सिनेसृष्टी हादरली आहे. सुरुवातीला छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पल्लवी डे हिचा मृत्यू झाला होता. १५ मे रोजी पल्लवीचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेला आढळला. पल्लवीच्या कुटुंबाने याबाबत हत्येचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवला. त्यामुळे पल्लवीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली.

अभिनेत्री विदिशाच्या मृत्यूचा तपास सुरू

पल्लवीच्या मृत्यूनंतर २ दिवसांनी उत्तर कोलकाता येथे मॉडेल अभिनेत्री विदिशा डे मजुमदार हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. विदिशानं एक सुसाइड नोटही लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी कुणाला जबाबदार धरू नका असं त्यात म्हटलं होते. पोलिसांनी विदिशाच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीचे तिच्या बॉयफ्रेंडशी संबंधांबाबत चौकशी सुरू आहे. बॉयफ्रेंडमुळे ती मानसिक तणावाखाली होती असं तिचे मित्र म्हणतात. विदिशाने तिच्या सुसाइड नोटमध्ये तिला कॅन्सर असल्याचं म्हटलं परंतु तो नव्हता असं चौकशीतून समोर आले.

विशेष म्हणजे या दोन्ही तपासात एक साम्य म्हणजे मंजूषा नियोगी आणि विदिशा दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. मंजूषाच्या आईनं सांगितले की, विदिशाच्या मृत्यूनंतर मंजूषा मानसिक तणावाखाली होती. मंजूषाचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. मंजूषा आणि विदिशा या दोघींच्या मृत्यूमध्ये काही कनेक्शन आहे का? या दोघींच्या मृत्यूमागं कुठलं रहस्य दडलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस संबंधित तपास बारकाईने करत आहे.