मेक्सिको सिटी - केलेला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. पुरावे लपवण्यासाठी सराईत गुन्हेगार अनेक क्लुप्त्या लढवतात. त्यातून त्यांचे गुन्हे काही दिवस लपवले जातात. मात्र अखेरीस हे गुन्हे उघडकीस येतात. (mexico serial killer ) असाच धक्कादायक प्रकार मेक्सिकोमध्ये उघडकीस आला आहे. मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी शहराच्या बाहेरील भागामध्ये एका संशयित आरोपीच्या घरात तपास यंत्रणांनी केलेल्या खोदकामामधून आतापर्यंत हाडांचे तीन हजार ७८७ तुकडे सापडले आहेत. ही हाडे १७ वेगवेगळ्या लोकांची असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. (3 thousand 787 pieces of bones found in the house, 17 murders are likely to be found)
मेक्सिकोमधील तपासयंत्रणांच्या म्हणण्यानुसार हे खोदकाम अद्याप समाप्त झालेले नाही. हे खोदकाम १७ मेपासून सुरू आहे. तपासकर्त्यांना संशयित आरोपी राहत असलेल्या घरातील लादी फोडून आतमध्ये खोदकाम सुरू केले होते. आता या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्याचा तपास यंत्रणांचा विचार आहे. भंगाराने भरलेल्या या घरामध्ये अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या लोकांची ओळखपत्रे आणि अन्य सामान सापडले आहे. हे पुरावे या हत्या अनेक वर्षांपूर्वी झाल्या असाव्यात याकडे इशारा करत आहेत. तपास यंत्रणांनी शनिवारी शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, हाडांच्या तुकड्यांचे परीक्षण करण्याचे काम सुरू आहे. ज्यामध्ये सावधानपूर्वक या हाडांची स्वच्छता करण्यापासून ते हे अवयव शरीरातील कुठल्या भागाचे आहेत. यापर्यंतची माहिती घेतली जात आहे. यामाध्यमातून ही हाडे किती लोकांची आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार हे अवशेष १७ लोकांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संशयित आरोपीची ओळख उघड न करण्याच्या देशाच्या कायद्यातील तरतुदीमुळे या प्रकरणात पकडण्यात आलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. या व्यक्तीविरोधात एका ३४ वर्षीय महिलेची हत्या केल्या प्रकरणी खटला सुरू आहे. एका पोलीस कमांडरने त्याची पत्नी बेप्ता झाल्यानंतर या ७२ वर्षींय व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. तो या पोलीस कमांडरच्या पत्नीला वैयक्तिक दृष्ट्या ओळखत असे आणि त्याला या पोलीस कमांडरच्या पत्नीसोबत खरेदीसाठी जायचे होते. मात्र त्या दिवशी ही महिला घरी परतली नाही. त्यानंतर या पोलीस कमांडरने त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्यामागे या व्यक्तीचा हात असल्याचे सांगितले. तपासामध्ये संबधित महिला ही या व्यक्तीच्या घरी जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. मात्र ही महिला बाहेर येताना दिसली नाही. नंतर या महिलेचे सामान संशयिताच्या घरातून जप्त करण्यात आले.