शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

धक्कादायक... सुनेने केली ८० वर्षीय सासूची हत्या; चाकून केले वार

By योगेश पांडे | Published: September 02, 2023 11:44 PM

संभाजी चौकाजवळचा परिसर हादरला : चाकूने केले वार

नागपूर : सासूसुनेचे वाद हे समाजासाठी नवीन नाही व काही ना काही कारणावरून सासूसुनांमध्ये ‘तु तु मै मै’ होतच असते. मात्र एका सुनेने रागाच्या भरात थेट आपल्या ८० वर्षीय सासूवर चाकूने वार करत हत्याच केली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे संभाजी चौकाजवळच्या परिसरात खळबळ उडाली होती.

ताराबाई शिखरवार (८०) असे मृतक महिलेचे नाव असून पूनम शिखरवार (३६) ही आरोपी सून आहे. आनंद शिखरवार यांचे संभाजी चौकापासून ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावर गॅरेज आहे व मागेच त्यांचे घर आहे. त्यांच्या आई ताराबाई, पत्नी पूनम, ९ वर्षीय मुलगा व १३ वर्षीय मुलगी असे कुटुंब एकत्रित रहायचे. पूनम यांचे सासूशी फारशे पटत नव्हते. पूनम शीघ्रकोपी असून तिच्यावर डॉक्टरांचे उपचारदेखील सुरू होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सासू व सून घरातच असताना लहान मुद्द्यावरून वाद झाला. रागात पूनमने घरातील चाकू घेतला व त्याने सासूवर वार केला. वर्मावरच वार बसल्याने ताराबाई यांचा मृत्यू झाला. आरडाओरड एकून आनंद घरात आले आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आईला तातडीने मेडिकलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. आरोपी पूनमला पोलिसांनी अटक केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती ठाणेदार मंगेश काळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस