बारामती : बारामती शहरातील प्रगतीनगर शेळकेवस्ती येथे पूर्ववैमनस्यातून घरात घुसून २६ वर्षीय तरुणीवर धारदार सत्तूराने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि 22)रात्री घडली. ही तरुणी मानेवर, तोंडावर, हातावर वार झाल्याने गंभीर जखमी झाली आहे. रुबिना कुरेशी असे खुनी हल्ला झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत फिर्यादी हसीना गुलाब कुरेशी ( वय ६५ रा. खाटीकगल्ली, बारामती, सध्या रा. शेलकेवस्ती तांदुळवाडी) यांनी आरोपी अरबाज (आब्बू) अल्ताप कुरेशी रा.खाटीक गल्ली बारामती (ता. बारामती ) याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि.२१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील शेळकेवस्ती तांदुळवाडी येथे हा प्रकार घडला .याच आठवड्यात खूनी हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीस अटक करून बारामती प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता २५ तारखेपर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे .याच आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर पूर्ववैमनस्यातून खूनी हल्ला करण्यात आला होता .यामध्ये तिचा मृत्यु झाला. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या खुनाचे गूढ उकलले आहे. तर गुरुवार ( दि.२० ) रोजी काटेवाडी येथे तरुणावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आणखी एका तरुणीवर खूनी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला घरगुती कारणास्तव झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या तरुणीची प्रकृती गंभीर आहे. येथील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी तरुणीला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा व त्यांच्यात गल्लीतील खेळण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मध्यस्थी करून मिटवण्यात आला होता. मात्र, तोच राग आरोपी अरबाज (आब्बू) अल्ताप कुरेशी याने मनात धरून फिर्यादीच्या घरात शिरून हातातील धारधार लोखंडी सत्तूराने मानेवर तोंडावर हातावर वार करून गंभीर जखमी केले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे अधिक तपास करीत आहेत.
खळबळजनक.! पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:49 PM
हा हल्ला घरगुती कारणास्तव झाल्याची माहिती पोलिसांनी दिली...
ठळक मुद्देबारामती शहरातील घटना : एकाच आठवड्यातील तिसरा खूनी हल्ला तरुणी मानेवर, तोंडावर, हातावर वार झाल्याने गंभीर जखमी आरोपीस २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी