अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या दिशेने तपास करत एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह काही जणांना अटक केली आहे. शिवाय आणखी काही जणांची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, धक्कादायक गोष्ट म्हणजे सुशांतच्या बहिणीचे नावही आता या प्रकरणात समोर येत आहे. सुशांतची बहीणदेखील ड्रग्ज पार्टीत असायची असा आरोप केला जात आहे.एनसीबीकडून सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी सुरू आहे. श्रुतीचे वकील अशोक सरोगी यांनी सुशांतच्या बहिणीवर आरोप केला आहे की, सुशांतची बहीण ड्रग्ज घ्यायची, ड्रग्ज पार्टीत ती सामील असायची. सुशांतची कोणती बहीण ड्रग्ज घ्यायची याबाबत त्यांनी सांगितलं नाही, तिचं नाव अद्याप स्पष्ट केलेलं नाही. एनसीबीकडून तिचीही चौकशी होते आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.याआधी रियाने सुद्धा सुशांतच्या बहिणींवर आरोप केले होते. 8 जूनला सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर सुशांतची बहीण मीतू त्याच्यासह राहायला आली होती. शिवाय रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंहविरोधातही वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिनं सुशांतला औषधांचं बोगस प्रीस्क्रिप्शन दिल्याचा रियाने आरोप केला आहे. आता या प्रकरणातील ड्रग्जच्या दिशेने तपासातही सुशांतच्या बहिणीचं नाव घेतलं जातं आहे. पुढे तिची देखील चौकशी केयी जाऊ शकते, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या कबुली जबाबात सुशांतच्या ड्रग्ज पार्ट्यांबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. बॉलिवूडमधील दिग्ग्ज व्यक्तींसह अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे. बॉलिवूडमधील २५ जणांची नावं तिनं आपल्या जबाबात दिली. त्यानुसार एनसीबीने डोझियर बनवले आहे. यामध्ये सारा अली खान, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रीत सिंह आदी व्यक्तींची नावे उघडकीस आली आहेत. मात्र त्यांना समन्स देण्यात आलेला नाही, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे. तसेच सुशांतच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीत एसीबीला ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि औषधं हाती लागली आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग