कोल्हापूर - मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्यांने राहत्या फलॅटमध्ये गफळास घेवून आत्महत्या केल्याची ºहदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम संजय कोळी (वय १७, रा. गोंदवले, ता. मान, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. माहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पोलीसांनी सांगितले, श्रीराम कोळी हा चाटे स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याची बहिण तेजश्री बी. ई. मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. ती कोल्हापूरातच खासगी कंपनीत नोकरी करते. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते. श्रीरामची बारावीची परिक्षा सुरु आहे. तो हुशार होता. मंगळवारी त्याचा शेवटचा माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी बहिणीकडून तीनशे रुपये घेवून तो पेपरला गेला. जाताना त्याच्या चेहºयावर कुठलाही तणाव किंवा नैराश्य नव्हते. दूपारी पेपरहून आलेनंतर तीनच्या सुमारास बहिणीने त्याला फोन करुन पेपर कसा गेला याची विचापूस केली. त्याने चांगला गेला असे सांगुन फोन ठेवला. बहिण तेजश्रीने तो असे काही करुन घेईल असे स्वप्नातही पाहिले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आली. दरवाजा आतून बंद होता. तिने श्रीरामला हाक दिली, परंतू आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता श्रीराम सिलींग फॅनला उटकत असल्याचे दिसून आले. हे दूष्य पाहून ती जागेवरच कोसळली. आरडाओरड करु लागल्याने आजूबाजूचे रहिवाशी आले. येथील काही तरुणांनी दरवाजा मोडून काढला असता श्रीरामने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकाराची वर्दी राजारामपूरी पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. श्रीरामने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलीसांना मिळून आली. भावाच्या विरहाने अक्रोश करणाºया तेजश्रीला माजी महापौर माळवी यांनी धीर दिला.
श्रीरामचे वडील डॉक्टर आहेत. आई गृहीणी आहे. मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी बहिणीसोबत त्याला कोल्हापूरला पाठविले होते. त्याचा सर्वजण लाड खूप करीत. तो हुशारही होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच आई-वडीलांना मानसिक धक्का बसला. नातेवाईकांसोबत ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले.