नशेची सवय माणसाला काय काय करायला लावते याचं एक धक्कादायक उदाहरण ब्राझीलमधून समोर आलं आहे. इथे एका आईने ड्रग्ससाठी आपल्याच लेकरांना विकलं. जेणेकरून तिला ड्रग्स खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील. रियो डी जेनेरियाच्या साओ पेड्रो दा एल्डियाच्या मारिल्जा मेडिरोस दा कान्सेइकाओ नावाच्या महिलेला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.
दीड महिन्याच्या मुलीलाही सोडलं नाही
'द सन'च्या रिपोर्टनुसार महिलेने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये आपल्या दीड महिन्याच्या मुलीला रेजिआओ डॉस लागोस भागातील एका परिवाराला केवळ £ 27.60 (2,850 रुपये) ला विकलं. अटक केल्यावर या महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिने तिच्या मुलीच्या बदल्यात ड्रग्स घेतलं होतं. आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, महिलेने तिच्या इततर ७ लेकरांनाही विकलं तर नसेल ना? कारण पोलिसांना महिलेच्या केवळ एकाच मुलाबाबत माहिती मिळाली आहे. जो आपल्या वडिलासोबत राहतो. (हे पण वाचा : अंडरगारमेंट्समधून ड्रग्स घेऊन जात होती १९ वर्षीय डीलर, पोलिसांनी पकडलं तेव्हा झाले हैराण)
बालगृहात आहे मुलगी
पोलीस प्रमुख मिल्टन सिकीरा ज्यूनिअरने सांगितलं की, 'दीड महिन्याच्या मुलीला गेल्यावर्षी चाइल्ड सर्व्हिसकडे देण्यात आलं होतं. महिलेला एकूण १० मुले आहेत. ज्यातील केवळ एक मुल तिच्यासोबत होतं आणि दुसरं मुल आपल्या वडिलासोबत राहतं. आता आम्ही इतर मुलांचा शोध घेत आहोत आणि ही माहीत घेत आहोत की, तिने इतर मुलांनाही विकलं का?
याप्रकरणी कथितपणे मुल विकत घेणाऱ्या ४२ वर्षीय एलिजांगेला डा सिल्वा पचेको यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीशांनुसार, त्याला ६ महिन्यांपर्यंत कम्युनिटी सर्व्हिस करावी लागेल. त्यासोबतच त्याला एका लोकल चॅरिटीला ३ महिन्याचा पगार द्यावा लागेल. ही संस्था मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.