Chain Snatching Viral Video: चेन स्नॅचिंग हा प्रकार अतिशय धोकादायक आहे. अनेकवेळा याविरोधात पोलिसांने दंड थोपटले आहेत, पण सर्व प्रयत्न करूनही चेन स्नॅचिंगच्या घटना कमी होत नाहीत. देशातील बहुतांश शहरांच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही गुन्हेगार त्याला न जुमानता चेन स्नॅचिंग करताना दिसतात. नुकतेच याचे एक भयावह उदाहरण तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाले. चेन स्नॅचिंगच्या या घटनेने स्थानिकांसह पोलिसही हैराण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तामिळनाडूतील चेन स्नॅचिंगच्या या घटनेत गुन्हेगारांचा नवा प्रकार समोर आला. आतापर्यंत चोरटे दुचाकीवरून चेन स्नॅचिंगच्या घटना घडवत असल्याचे माहिती होते. मात्र या घटनेत गुन्हेगारांनी कारचा वापर केला. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे, कारण यात पीडितेचा जीवही जाऊ शकला असता. तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील बीलामेडू परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला सोमवारी मॉर्निंग वॉकला गेली होती. ती तिच्या घरापासून काही अंतरावर पोहोचली असावी की तिच्यावर आधीच लक्ष ठेवलेल्या गुन्हेगारांनी तिचा पाठलाग केला. एक पांढऱ्या रंगाची कार आली, त्यात ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसलेल्या चोरट्याने खिडकीतून हात काढून महिलेच्या गळ्यातील चेन ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने तिची चेन पकडून ठेवली त्यामुळे ती खाली पडली. त्यानंतर चोराने पीडितेला कारसह काही मीटरपर्यंत ओढत नेले. महिला खाली पडताच कार भरधाव वेगात पळून गेली. पाहा व्हिडीओ-
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या घटनेत सामील असलेल्या शक्तीवेल आणि अभिषेक या दोन चोरट्यांना अटक केली. या घटनेत वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत झाली. गाडीला नंबरप्लेट नसतानाही पोलिसांनी गाडीवरील स्टिकर ओळखून त्याचा माग काढला