मुंबई - अभिनेते रजत बेदी यांच्या कारखाली चिरडून जखमी झालेल्या कचरावेचक राजेश दूत (३८) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. अंधेरीच्या कूपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गंभीर जखमी अवस्थेत बेदी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानुसार बेदी यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबईत अंधेरीच्या डीएन नगर परिसरात अभिनेता रजत बेदीच्या कारनं धडक दिल्यामुळे एका व्यक्ती गंभीर जखमी झाला. संबंधित व्यक्तीला पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वत: रजत बेदी यानंच अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचं म्हटलं होतं.
डीएन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रजद बेदीविरोधात आयपीसी कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कार स्वत: रजत बेदी चालवत होता. सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता रजत बेदी घरी परतत असताना शितलादेवी मंदिराजवळ राजेश अचानक रस्त्याच्या मध्ये आला आणि रजत बेदी यांच्या कारची जोरदार धडक त्याला बसली.