Video: धक्कादायक !कोचिंग क्लासेसच्या संचालकांवर विद्यार्थ्यानेच झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 04:20 PM2023-06-22T16:20:00+5:302023-06-22T16:20:35+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना शहरात संचालक स्वत:चा कोचिंग क्लास चालवत होता.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या मुरैन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून दोन विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेसच्या संचालकावर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या संचालकांस मुरैना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती नाजूक असल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमी संचालकास उपचारासाठी ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालयासाठी रेफर केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना शहरात संचालक स्वत:चा कोचिंग क्लास चालवत होता. दुपारी मोटारसायकलवरुन दोन विद्यार्थी त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी, दोन्ही विद्यार्थ्यांनी संचालकास बाहेर बोलावून त्यांच्यासोबत चर्चा सुरू केली. याचदरम्यान, दुचाकी गाडीवर पाठिमागे बसलेल्या विद्यार्थ्याने हातातील बंदुकीने कोचिंग क्लासेसच्या संचालकावर गोळी झाडली. त्यानंतर, ते तेथून लगेचच फरारही झाले.
#WATCHमध्य प्रदेश: मुरैना के ज़ोरा रोड क्षेत्र में फीस के मुद्दे को लेकर कोचिंग निदेशक को उसके पूर्व छात्रों ने कथित तौर पर गोली मारी। पुलिस मामले में जांच कर रही है।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 22, 2023
(सोर्स: CCTV) pic.twitter.com/9NyeQqHJ6o
या जीवेघेण्या हल्ल्यात कोचिंग क्लासेसचा संचालक गंभीर जखमी झाला होता. त्यास, स्थानिकांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांस ग्वाल्हेर येथे उपचारासाठी रेफर केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून तपासही सुरू केला आहे, गोळी झाडणारे विद्यार्थी हे येथील क्लासमध्ये कोचिंगसाठी होते, ते या क्लासेसचे माजी विद्यार्थी आहेत.