शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

धक्कादायक! नवजात बालकाचा मृतदेह तोंडात घेऊन भटकत होता कुत्रा, पाहून लोकांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 6:29 PM

Street dog romaing with deadbody of newborn baby : घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृतदेह कुत्र्याने चावल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मृतदेह मुलाचा आहे की मुलीचा हे कळणे कठीण झाले आहे.

मध्य प्रदेशातील  खरगौनमधून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. जिथे एक भटका कुत्रा नवजात अर्भकाचा मृतदेह तोंडात घेऊन फिरत होता. ज्याने हे दृश्य पाहिले त्याला धक्काच बसला. स्थानिक लोकांनी मोठ्या कष्टाने नवजात अर्भकाचा मृतदेह कुत्र्याच्या तोंडातून बाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृतदेह कुत्र्याने चावल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मृतदेह मुलाचा आहे की मुलीचा हे कळणे कठीण झाले आहे.   ही घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली 

खरगौन शहरातील जैतापूर चौकी परिसरातील साकेत नगरमध्ये एका भटक्या कुत्र्याने नवजात अर्भकाचा मृतदेह तोंडात दाबून वसाहतीत फिरू लागले. हे दृश्य पाहून कॉलनीतील लोक भयभीत झाले. कुत्र्याच्या तोंडातून नवजात अर्भकाची कशी तरी सुटका करण्यात आली. कॉलनीत राहणारे संदीप नांदूरकर यांनी सांगितले की, एक भटका कुत्रा नवजात अर्भकाचा मृतदेह तोंडात दाबून इकडे तिकडे फिरत होता. नवजात अर्भकाच्या मृतदेहाची दुरावस्था झाली होती. मोठ्या कष्टाने कुत्र्याच्या तोंडातून मृतदेह काढला व पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.नवजात अर्भकाचा मृतदेह तोंडात दाबून कुत्रा फिरत राहिलाघटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी दिनेश सिंह कुशवाह पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात नेला. नवजात अर्भकाचा मृतदेह कुत्र्याच्या तोंडाने दाबून त्याची विटंबना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टपोर्टेम रिपोर्टनंतरच नवजात बालकाचे लिंग कळेल. कुत्र्याने नवजात अर्भकाचा मृतदेह कोठून आणला आणि तो कोणाचा आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आतापर्यंत याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. पोलीस नवजात अर्भकाच्या मृतदेहाची चौकशीतत्याचबरोबर या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आजतागायत प्रशासनाकडून या दिशेने कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात आलेले नाही. या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :dogकुत्राMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस