सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे एकाकी पडलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरनेत घडली आहे. त्याठिकाणी तो भाऊ आणि वहिनीसोबत रहायला होता. परंतु लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्वजण गावी तर तो एकटाच कोपरखैरनेत अडकला होता.सुरज सखाराम सुर्वे (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो इंजिनियर असून ऐरोलीतील एका कंपनीत नोकरीला होता. तर जावळी येथील डांगरेघर त्याचे मूळ गाव आहे. मंगळवारी दुपारी कोपरखैरणे सेक्टर 4 येथील राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. अविवाहित असल्याने तो त्याठिकाणी तो भाऊ व वहिनीसह राहायला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागले असता त्याचा भाऊ व वहिनी गावी गेले होते. त्यानंतर लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे तो एकाकी पडला होता. त्यामुळे परिसरातच राहणाऱ्या परिचयाच्या कुटुंबाकडून त्याला जेवण दिले जात होते. परंतु त्याला कुटुंबापासून दुरावल्याची खंत वाटत होती. घरच्यांसोबत नियमित फोनवर बोलून देखील त्याला प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली होती. परंतु लॉकडाऊनमुळे घरच्यांची भेट होत नसल्याने तो एकांतामध्ये रडत बसायचा. याच नैराश्यात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळ दरम्यान त्याने राहत्या घरात आत्महत्या केली.
तपासणीसाठी मोटार थांबवल्याच्या रागातून पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ
PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी
Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल
मंगळवारी दुपारी परिसरात राहणारी परिचयाची व्यक्ती त्याच जेवण घेऊन घरी गेली होती. परंतु त्याने दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. यावेळी दरवाजा तोडला असता आतमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिट्टी देखील आढळून आली. त्यामध्ये लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. लॉकडाऊन मुळे घरी एकटाच असल्याने घर खायला उठत आहे. घरच्यांची सतत आठवण येते परंतु भेट होऊ शकत नाही. तर लॉकडाऊन अजून किती वाढेल त्याचीही खात्री नाही. यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिट्टीत म्हटले आहे. याप्रकरणी कोपर खैरणे पोलिसठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेवरून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर लॉकडाऊन लागू झाल्यापासूनaअवघ्या महिन्यात शहरात झालेली हि आत्महत्येची चौथी घटना आहे. दरम्यान त्याच्या आत्महत्ये मागे नोकरीच्या कारणांचा समावेश आहे का ? याचा देखील कोपरखैरणे पोलीस तपास करत आहेत.