धक्कादायक! लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:25 PM2020-01-21T13:25:12+5:302020-01-21T13:27:46+5:30
नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३९४ प्रमाणे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई - गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पतीसोबत भांडण करून उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घडली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच काल सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींची नवे सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आहेत.
धक्कादायक! लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना बेड्या https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) January 21, 2020
पिडीत महिला रात्री ११ वाजताच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात असताना साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे हजर होते. त्यांनी पीडित महिलेस झाडीत ओढून घेवून तिच्याशी जबरी संभोग करीत असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी पाहिले आणि त्यांनी पिडीत महिलेला मदत करण्याऐवजी दुष्कर्म करत तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक शोषण केले.
तसेच पिडीत महिलेचे २८ हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून घेवून पळून जात असताना पिडीत महिलेस रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी १०० क्रमांकावर फोन केला असता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने दोन आरोपी लागलीच अटक केले. उर्वरित आरोपी अटक करण्यात आले आहेत. नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३९४ प्रमाणे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
खळबळजनक! एलटीटी परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
Mumbai: A woman was allegedly gang-raped in Nehru Nagar area last night. Case registered, all 4 accused have been arrested. Further investigation underway. #Maharashtra
— ANI (@ANI) January 21, 2020