भंडारा : पार्टीत मद्यप्रशन केल्यानंतर झालेल्या वादात लोखंडी राॅड व चाकूने भोसकून तरुणाचा खून करुन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली. तुमसर तालुक्यातील बघेडा येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अभिमन्यू अरविंद माने (२२) रा. आंबेडकर वार्ड, तुमसर असे मृताचे नाव. तो सोमवारी रात्री बघेडा येथे मित्राकडे पार्टीसाठी गेला होता. तेथे मद्यप्रशन केल्यानंतर वाद झाला. या वादात लोखंडी राॅड व चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर मृतदेह गावाजवळील नाल्यात फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोबरवाही पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. कुलदीप डोंगरे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याच घरी रात्री पार्टी होती. नागपूरचे चार मित्र या पार्टीत सहभागी असल्याची माहिती.