इंदोर - मध्य प्रदेशमध्ये दोन वर्षापूर्वी पतीने त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलचे हँडल घातले. त्यानंतर त्याच्यावर एमवाय (महाराज यशवंतराव) रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करुन हँडल बाहेर काढले. ४ तासाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया १८ डॉक्टरांमुळे यशस्वी झाले आहे. दरम्यान, महिलेची प्रकृती पुढच्या ७२ तास गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तिच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. आरोपी पती प्रकाश भिल उर्फ रामा (३५) याला रविवारी चंदन नगर पोलिसांनीअटक केली आहे.
महिलेच्या पोटामध्ये खूप दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एमवाय रुग्णालयामधील डॉ. सोमेन भट्टाचार्य यांच्यासह १८ डॉक्टरांच्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया केली. या डॉक्टरांनी तब्बल ४ तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी महिलेच्या शरीरातील मोटारसायकलचा हँडल काढला. शस्त्रक्रियेनंतर पुढचे ७२ तास महिलेसाठी गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हँडलमुळे महिलेच्या पोटातील अवयवांना मोठे नुकसान पोहचले आहे.
पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधामुळे पीडित महिला नाराज होती. यावरूनच त्यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. भांडणानंतर संतापलेल्या महिलेच्या पतीने तिला दारु पाजून तिच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलचे हँडल टाकले. अब्रूखातर ही बाब महिलेने दोन वर्ष कोणालाच सांगितली नव्हती. दरम्यान तिच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले आणि तिला चालणे-फिरणे कठीण झाले. पोटातील वेदना असह्य झाल्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिची व्यथा ऐकूण पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महिलेने अनेकदा चंदन नगर पोलीस ठाण्यात पती मराहाण करत असल्याची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार गंभिरतेने घेतली नव्हती.