मुंबई - बुधवारी संध्याकाळी केनियाचा नागरिक सायरस ओमोंडी हे मुलुंड येथील हॉटेलच्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळला. कहावा वेंदानी काउंटी असेंब्लीचे सदस्य (एमसीए) ३१ जानेवारी रोजी शैक्षणिक दौर्यावर मुंबई आले होते.ओमोंडी हे १ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण समितीतील त्यांच्या सहका-यांसह एका कार्यशाळेसाठी मुलुंड येथे एका हॉटेलात राहत होते. ११ फेब्रुवारीला ते जेथे थांबले होते त्या हॉटेल त्रिमूर्तीवर परत आले होते. १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा एक सहकारी ओमोंडी रूमचा दरवाजा उघडत नव्हते म्हणून हॉटेलच्या अधिकाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी ओमोंडी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलिसांनी घटनेसंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
धक्कादायक! केनियाच्या नागरिकाचा मुंबईच्या हॉटेलात सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 22:12 IST
मुलुंड पोलिसांनी घटनेसंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
धक्कादायक! केनियाच्या नागरिकाचा मुंबईच्या हॉटेलात सापडला मृतदेह
ठळक मुद्देकहावा वेंदानी काउंटी असेंब्लीचे सदस्य (एमसीए) ३१ जानेवारी रोजी शैक्षणिक दौर्यावर मुंबई आले होते. १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा एक सहकारी ओमोंडी रूमचा दरवाजा उघडत नव्हते म्हणून हॉटेलच्या अधिकाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले.