बिहारमधील पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, येथे एका तरुणाचा मृतदेह सापडला. या मृतदेहाच्या तापासात मोठा खुलासा झाला आहे. सासू, सासरा आणि पत्नीने मिळून तरुणाची हत्या केल्याच समोर आलं आहे. काही कारणांमुळे पती आणि पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. एकदा जोराचा वाद झाला यात पत्नीसह घरच्यांनी मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर या हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
ऑफिसच्या पायऱ्या चढताना केला विनयभंग, आसपासच्या लोकांनी रोडरोमिओला हाणले!
तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू, सासरा आणि पत्नीने मिळून तरुणाचा गळा आवळून हत्या केली. मृताची पत्नी अस्मारी उर्फ मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केले होते. मृत सुभाष प्रजापतीच्या भावानी या संदर्भात माहिती दिली. त्या महिलेचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध होते आणि तिला चौथ्यांदा लग्न करायचे होते. सुभाष याचा याला विरोध होता. यामुळेच त्या तरुणाची हत्या केली. मयत हा अंमली पदार्थांचे व्यसनी होता, त्यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडणे होत होती.
कुटुंबीयांनी सांगितले की, सुभाष प्रजापती यांचा दोन वर्षांपूर्वी फुलवारी शरीफ भुसौला दानापूर येथील अस्मेरी खातून हिच्याशी विवाह झाला होता. अस्मारी खातून हिचे यापूर्वी दोनदा लग्न झाले होते. दोन्ही पतींना सोडल्यानंतर असगरीने दोन वर्षांपूर्वी सुभाष प्रजापती याच्याशी तिसरे लग्न केले. मृत तरुणाच्या भावाने दिलेली माहिती अशी, असगरी खातूनने सुभाषसोबत लग्न केले. असगरी खातून यांना दोन पतीपासून दोन मुले आहेत.
सुभाषची पत्नी अजमेरी खातून हिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. पत्नी अजमेरी खातून चौथ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती, याची माहिती सुभाष प्रजापती यांना मिळाली होती. या लग्नाला सुभाषने पत्नी अजमेरी खातून हिला विरोध सुरू केला. या विरोधामुळे पत्नी अजमेरी खातून, सासू अख्तारी खातून आणि सासरे मोहम्मद अलाउद्दीन यांनी मिळून जावयाचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी अगोदरच या तिघांवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सुभाष प्रजापती यांचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना मृताच्या मानेवर खुणा आढळल्या. त्यानंतर त्यांनी तपासाची दिशा बदलली. सुभाष यांच्या सासरच्या परिसरात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सासरच्या मंडळींची कडक चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.