बेंगळुरू : महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्यानंतर आता पुन्हा कर्नाटकमध्ये सत्तानाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमध्ये नुकतीच पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून 15 जागांवर येत्या 4 डिसेंबरला मतदान होणार आहे. या जागा भाजपासाठी सत्ता टिकविण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. काँग्रेस, जेडीएसच्या 17 आमदारांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. काँग्रेसचे आमदार तन्वीर सैठ यांच्यावर एका लग्न समारंभादरम्य़ान रविवारी रात्री उशिरा जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. सैठ हे नरसिंहराज मतदारसंघातून आमदार आहेत. गंभीर जखमी झाल्याने त्यांना म्हैसुरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर चाकू हल्ल्यामुळे खोलवर घाव झालेले आहेत. यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले.
या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल असून यामध्ये तन्वीर यांचा शर्ट रक्ताने माखलेला दिसत आहे. त्यांना विवाहस्थाळवरून वाहनामध्ये नेण्यात येत असतानाचा हा व्हिडीओ आहे.
उपस्थितांनी हल्लेखोर फरहान पाशा याला अटक केली असून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तन्वीर यांच्यावर हल्ला करून पाशाने पळण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही.