शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 7:46 PM

Minor girl Suicide Case : संशयिताला कोठडी : बलात्काराचे कलम वाढविले

ठळक मुद्देया गुन्ह्यात बलात्कार व लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,११ (४) १२ आदी कलम वाढविण्यात आले आहे.

जळगाव :  प्रियकराकडून सतत चिडवले जात असल्याच्या नैराश्येत आत्महत्या केलेली १५ वर्षाची मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, शवविच्छेदन करताना हा प्रकार उघडकीस आला असून पीडितेचा गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या अक्षय गोविंदा चोपडे (२८) व ऋषीकेश नारायण कोळी (२३,रा.नवी दाभाडी, ता.जामनेर) या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात बलात्कार व लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,११ (४) १२ आदी कलम वाढविण्यात आले आहे.

जामेनर तालुक्यात १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती. अक्षय गोविंदा चोपडे  व ऋषीकेश नारायण कोळी हे दोन तरुण पीडितेला दोन महिन्यापासून चिडवत होते, सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. तपासात दोघं जण तिच्या घराजवळ जावून चिडवत होते तर पीडिता हिने लाल शाईच्या पेनने वहिच्या पानावर ऋषीकेश हे नाव मराठीत तर ‘आय लव्ह यु’ असे इंग्रजीत लिहिले होते..त्यातही खाली ‘ऋषीकेश तुला माहित नसले मी तुझ्यावर किती प्रेम करते अन तुने जर मला विसरायची कोशिश केली तर...असे मराठीत लिहिलेले होते.संशयिताची वैद्यकिय तपासणी होणारमुलीने आत्महत्या केल्यानंतर अक्षय व ऋषीकेश या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार अक्षय याला ८ रोजी ११ वाजता तर ऋषीकेश याला बुधवारी दुपारी दोन वाजता अटक करण्यात आली. तपासाधिकारी राजेश काळे यांनी दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील भारती खडसे यांनी पीडितेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून चौकशीसाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर दोघांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान,  शवविच्छेदन करताना पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यामुळे अटकेतील दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून तेव्हाच नेमके कोणी शारीरीक संबंध केले हे स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक