शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

By मनीषा म्हात्रे | Published: January 21, 2023 4:57 AM

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

मुंबई : कॉलेजसाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यास पार्क साईट पोलिसांना यश आले आहे. तिचे अपहरण करत एक लाखात राजस्थानमधील व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पार्क साईट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी मुलीसोबत लग्न  करणाऱ्या व्यक्तींसह तिची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.  हरविलेल्या मुलीचा मोबाईल बंद असल्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. २३ डिसेम्बर रोजी हरविलेली मुलगी एक दादर रेल्वे स्टेशन येथे एक  पुरुष व महिलेसह दादर हुबळी एक्सप्रेस मध्ये चढताना दिसून आली. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरु केला. चौकशीत जोडप्याने मिरज चे तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तात्काळ मिरज रेल्वे स्टेशन येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले. २४ डिसेम्बर रोजी मुलगी दोघांसोबत दुचाकीवरून जाताना दिसली. 

दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास सुरु केला.  सदरची दुचाकी संबंधित व्यक्तीने  दादर रेल्वे स्टेशन येथुन लगेजद्वारे मिरजला नेल्याचे उघड झाले. दादर रेल्वे स्टेशन येथुन लगेजद्वारे पाठविलेल्या मोटार सायकलबाबत सविस्तर माहिती मिळताच, संबंधित व्यक्ती आणि त्याच्या सोबतची महिला  २२  तारखेला चेंबुर येथे तिच्या पतीला भेटण्यासाठी आल्याचे उघड झाले.

१६ जानेवारी रोजी पथक तिच्या पतीपर्यंत पोहचले. त्याच्याकडून मुलीसोबत असणारी महिला त्याची पत्नी सुनिता उर्फ सुधा मनोज जोशी (२४)  पत्नीचा मामा लडप्पा लक्ष्मण गोवी (३४) असल्याचे सांगितले. ते मूळचे कर्नाटकच्या हिरापुरचे रहिवासी आहे. त्यानुसार पथकाने कारवाई करत मुलीची सुटका केली. बळीत मुलीची विक्री करणाऱ्या, सुनिता , लडप्पा आणि गणपती हरिश्चंद्र कांबळे यांच्यासह तिच्याशी लग्न करणाऱ्याला बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई अटक करण्यात आली आहे. आरोपी २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

औरंगाबादमधून मुलगी ताब्यातसुनीता आणि तिच्या मामाने मुलीचे कर्नाटकच्या गणपती हरिश्चंद्र कांबळे (५०) यांच्या मार्फत राजस्थानच्या एका दुकानदारासोबत १ लाखाला विक्री करून लग्न लावून विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार, पथकाने औरंगाबाद तसेच कर्नाटक येथे रवाना झाले. हरवलेली मुलगी आणि लग्न लावून दिलेला भावाराम पदमाराम माली यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन पथक मुंबईत आले.

या पथकाची कामगिरीपार्कसाईट पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर तपस अधिकारी प्रमोद सानप, विकास पाटील आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादKarnatakकर्नाटकRajasthanराजस्थानPoliceपोलिसmarriageलग्न