पुणे / येरवडा : पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा काही तासात टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री येरवड्यात घडली. नितीन शिवाजी कसबे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. कसबे हा कालच येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटला होता. पॅरोलवर सुटल्यानंतर आरोपीचा खून होण्याची पुण्यातील ही तिसरी घटना आहे.
येरवडा पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ४ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नागेश राजू कांबळे (वय २५, रा. गोसावीवस्ती, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश कनचिले, आकाश सपकाळ, आकाश मिरे, गणेश आडसूळ, निखिल कांबळे, चेतन भालेराव, ओंकार, सोनवणी अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शादलबाबा चौक ते पर्णकुटी चौकदरम्यानच्या रोडवर रात्री पावणेअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कसबे याच्यावर मारहाणीसह इतर अनेक गुन्हे दाखल होते. एका गुन्ह्यात सहा महिन्यापूर्वी येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी पॅरोलवर सुटका करण्यात आली. टोळीतील साथीदार आणि नागेश कांबळे याचा मेव्हणा मयत गंड्या उर्फ निहाल लोंढे याचा बुधवारी जन्मदिन होता. घरी आल्यानंतर मित्रांसोबत नैवेद्य दाखवण्यासाठी गेले होते. नैवैद्य दाखविल्यानंतर नितीन कसबे , सागर कसबे, नागेश कांबळे व कुणाल चांदने हे रस्त्याने पायी चालत निघाले होते. त्याचवेळी शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेल समोर रामनगर कमानी खाली आकाश कनचिले व त्याच्या साथीदारांनी तीक्ष्ण हत्याराने नितिनवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यावर, हातावर,पायावर वार करण्यात आले होते.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई पोलीस निरीक्षक युनुस शेख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून खूनाचा गुन्हा येरवडा पोलिसांनी दाखल आहे. तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहे.
आणखी बातम्या...
पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज
Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर
हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा