आष्टी : तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे ८ जून रोजी फोनवर झालेल्या संभाषणाच्या गैरसमजातुनच कोरोनामुळे गावात आलेल्या जावयाचा खून करण्यात आला तर, अन्य एकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.
संजय वलवळे (वय ४०) असे मृत जावयाचे नाव आहे तर गावातील दादा खिळे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अशोक राजाराम खिळे यांचे जावई संजय वळवळे व गावातीलच दादा खिळे हे दोघे ८ जून रोजी एकत्र बसून गप्पा मारत होते. यावेळी संजय वळवळे याने खिळे यांचे जावाई रामेश्वर घुले याला फोन लावला. त्यावेळी त्या दोघांत फोनवर संभाषण सुरू असताना त्याचवेळी दादा खिळे संजयला काहीतरी म्हणाला. मात्र फोन चालू असल्यामुळे दादा खिळे आपल्यालाच बोलल्याचा घुले यांचा गैरसमज झाला. त्यामुळे रामेश्वर घुले याने त्याच्या सासरवाडीच्या लोकांना ‘दादा खिळे व संजय वळवळे हे दोन व्यक्ती सासरवाडीबद्दल अपशब्द बोलले असून त्या दोघांकडे बघा’ असे मोबाईलवरून सांगितले.
या गोष्टीचा राग धरून जाब विचारण्यासाठी चार ते पाच जणांनी दादा खिळे यांना मारहाण करून नंतर ते संजय वळवलेच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि संजयला बेदम मारहाण केली. जखमी संजयला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरने तपासले असता, संजयचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी कल्याण सोनाबा खिळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कोरोनामुळे जावई आला होता गावीमुंबई येथे एका खासगी कंपनीत संजय वलवळे हे नोकरी करतात. मात्र, कोरोना संकट आल्यामुळे ते त्यांची पत्नी मुलांसोबत सासरवाडीत आले होते. काही दिवसांपुर्वी ते गावात आल्यामुळे सर्वांशी त्यांच्या संवाद चांगला होता.