महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केवळ छोट्या मोठ्या गावखेड्यातच नव्हे तर प्रगत देशांमध्येही तितकाच चर्चिला जातो. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 65 महिलांनी पोलिसांकडे विचित्र तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याला महिलांना त्यांच्या घराच्या मेल बॉक्समध्ये असं काही सापडलं ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. एका ग्राफिकल संदेशासह मेल बॉक्समध्ये असं काही तरी पाठवणं ही गोष्ट खूपच विचित्र असल्याचे बोललं जात आहे.
ठराविक महिलांनाच पाठवले पत्र आणि 'ती' वस्तू
महिलांना मेलबॉक्समध्ये वापरलेले कंडोम मिळत असल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कृत्य जितके घृणास्पद आहे तितकेच ते भयानक आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील मेलबर्नचे आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, पोलिसांचा असा अंदाज आहे की हे या महिला या गुन्ह्याच्या माध्यमातून काही ना काही कारणाने एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि ते कुणीतरी त्यांना मुद्दाम लक्ष्य करत आहेत. या पिडीतांमधील समान दुआ म्हणजे तक्रार देणाऱ्या सर्व महिलांनी 1999 साली किलब्रेडा कॉलेज या खासगी मुलींच्या शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जो कुणी हे कृत्य करत आहे, तो ठराविक महिलांनाच लक्ष्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
लिफाफ्यात पत्र आणि वापरलेला कंडोम, पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांनी सांगितले की, अनेक पीडित महिलांना एकापेक्षा जास्त पत्र मिळाली आहेत ज्यात वापरलेले कंडोम लिफाफ्यात ठेवले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेले डिटेक्टिव्ह ग्रँट लुईस यांनी सांगितले की, आरोपीला किंवा आरोपींना लवकरात लवकर पकडता यावे यासाठी तपासकर्ते हस्ताक्षरापासून ते डीएनएपर्यंत सर्व काही तपासत आहेत. या महिलांचे पत्ते 24 वर्षांपूर्वीच्या शालेय वार्षिक पुस्तकातून काढण्यात आल्याचे समजते.
पत्रात काय मजकूर?
वापरलेल्या कंडोमसह सापडलेल्या पत्रात काही अक्षरे हाताने लिहिलेली आहेत तर काही टाईप केलेली आहेत. या पत्रांमध्ये सूचक, धमकी देणारे आणि अश्लील संदेश आहेत आणि असे संदेश स्त्रीसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नाहीत असे लुईस म्हणाले. आम्ही आरोपींना इशारा देत आहोत की हे सर्व बंद करा, आम्ही तुम्हाला शोधून काढू, असेही ते म्हणाले.
एका पीडितेचे म्हणणे....
मेलबॉक्समध्ये हे सर्व पाहून माझे पालक घाबरले आहेत, असे एका पीडितेने सांगितले. त्यांना असे वाटते की कोणीतरी धोकादायक व्यक्ती मला लक्ष्य करत आहे. या प्रकरणाशी मुलींच्या शाळेचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो माजी विद्यार्थी किंवा शाळेचा कर्मचारी असू शकतो. या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, जर इतर कोणत्याही आणखी महिलेला असे मेल येत असतील तर त्यांनी पुढे यावे जेणेकरून त्यांना मदत करता येईल.