शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

रील बनवायचं वेड, आईने ८ महिन्यांचं बाळ विकलं; तपास सुरू झाला अन् पोलिसही चक्रावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 9:11 PM

बाळाची विक्री केल्याचे पोलिसांना कळलं, मग पुढे काय घडलं... वाचा

Shocking, Mother sold baby: एका जोडप्याने स्वतःचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. मुलाला विकण्यामागचे कारण आश्चर्यकारक आहे. या जोडप्याने आपले 8 महिन्यांचे बाळ विकले. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बाळाच्या आईला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. बाळाचे वडील जयदेव फरार होते, पण त्यालाही अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या शेजाऱ्यांना मूल न दिसल्याने त्यांनी मूल कुठे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचे कबूल केले. रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा, म्हणून असं केल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी या जोडप्याची धडपड सुरू होती. अचानक त्यांनी आयफोन विकत घेतला आणि रील बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. ही घटना संशयास्पद वाटल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच खर्डा परिसरातील एका महिलेकडून या बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रियंका घोष नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली. शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील अंमली पदार्थांच्या सेवनात गुंतलेली आहे आणि या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती.

एका स्थानिक नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे त्यांच्या मुलीलाही विकणार होते. स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले, "मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला समजताच आम्ही पोलिसांना कळवले. पोलिसांनी जयदेवला अटक केली.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस