कल्याण : रेल्वे प्रवासात पत्नीची पर्स चाेरीला गेल्याने दाेन सहप्रवाशांवर संशय असल्याने अझर शेख याने त्या दाेन प्रवाशांचे अपहरण करून त्यांना भिवंडीतील घरात डांबून ठेवले. त्या दाेन जणांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. अपहरण करण्यात आलेल्या दाेन जणांच्या नातेवाइकांनी मुंबईतील नागपाडा पाेलिस ठाणे गाठले. पाेलिसांनी तत्काळ तपास करून आराेपी शेख याला अटक केली. डांबून ठेवलेल्या साजिद व सज्जात शेख या दाेन जणांची सुटका केली. हा गुन्हा कल्याण रेल्वे पाेलिसांकडे वर्ग केला असून ते तपास करीत आहेत.
अझर हा त्याच्या पत्नीसह जयनगरहून मुंबईकडे पवन एक्स्प्रेसने येत हाेता. ताे व त्याची पत्नी ज्या बाेगीतून प्रवास करीत हाेते. त्याच बाेगीत सज्जात आणि साजिद शेख हे दाेघे प्रवास करीत हाेते. अझर याच्या पत्नीची पैसे असलेली पर्स प्रवासात चाेरीस गेली. पर्स साजिद आणि सज्जात या दाेघांनी चाेरी केल्याचा संशय अझरला हाेता. या संशयामुळे त्याने या दाेघांना कल्याण स्थानकात उतरविले. त्या दाेघांना ताे त्याच्या भिवंडी येथील घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने दाेघांना घरात दाेन दिवस डांबून ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या घरच्या मंडळींकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. साजिद आणि सज्जात यांचे अपहरण झाल्याने त्यांच्या सुटकेसाठी नातेवाइकांनी मुंबईतील नागपाडा पाेलिसांकडे धाव घेतली. पाेलिसांनी अझरला अटक केली व त्याच्या घरातून साजिद आणि सज्जात या दाेघांची सुटका केली. पाेलिसांनी हा गुन्हा कल्याण रेल्वे पाेलिसांकडे वर्ग केला.