पुणे/ धायरी: सिंहगड रस्त्यावरील वडगांव बुद्रुक परिसरातील श्रीराम लॉजमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार मंगळवारी (दि.१४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकिस आला.नंदू बेबी अंधारे (वय ३९, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू अंधारे हे नगर जिल्ह्यातून सिंहगड रस्ता परिसरातील श्रीराम लॉज येथे १० जुलैपासून राहावयास आले होते. त्यांनी लॉज चालकाला कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आल्याचे सांगितले. सोमवारी रात्री ते जेवण करून रुममध्ये आराम करण्यासाठी गेले होते. आज सकाळी रूम साफसफाई करण्यासाठी गेलेल्या मुलाने दरवाजा उशिरापर्यंत ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान लॉज चालकाने खिडकीतून पाहिले असता त्यांनी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला आहे.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!
बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता
कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत
Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!
Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार
वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य