पाकिस्तानमधून एक संताजनक आणि माणूसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम आरोपीचं कृत्य वाचून मनाला धक्का बसेल. सिंधमध्ये गेल्या १३ ऑगस्ट रोजी जेव्हा पाकिस्तान जश्न-ए-आझादी साजरी करण्याची तयारी करत होता. त्याच दिवशी सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावात दफन करण्यात आलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आरोपीने कबरीतून बाहेर काढला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कारासारखं अमानवीय कृत्य केलं.
'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, आमना चांडीओ नावाच्या मुलीचा एक दिवसाआधी तापामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह सर्व रितीरिवाजासोबत दफन करण्यात आला होता. पण त्याच रात्री एका माथेफिरू व्यक्तीने मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर झाडामागे जाऊन तिच्या मृतदेहवर अत्याचार केला. नंतर मृतदेह तिथेच सोडून फरार झाला. या व्यक्तीचं नाव रफीक चांडीओ असून तो या भागातील गुंड आहे.
सकाळी काही मुलांची नजरेस पडलं की, मुलीचं कबर खोदलेली आहे आणि त्यात मृतदेह नाही. त्यांनी लगेच फोन करून याची सूचना मुलीच्या वडिलांना दिली. वडील आणि गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. पोलिसही आले आणि मृतदेह शोधण्याचं काम सुरू झालं. काही वेळाने एका झुडपात मुलीचा मृतदेह त्यांना सापडला. मुलीच्या शरीरावरून कफन गायब होतं. कपडेही निट नव्हते. पोलिसांनी लगेच मृतदेह हॉस्पिटलला नेला आणि तिथे डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचं सांगितलं. (हे पण वाचा : खुर्चीला बांधून दिला इलेक्ट्रिक शॉक; पत्नीनेच केला पतीचा खेळ खल्लास)
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे. लोक पोलिसांविरोधातही आपली नाराजी जाहीर करत आहेत. मुलीचे वडील रमजान चांडीओने पोलिसांवर आरोप केला की, सूचना मिळाल्यावर बरेच उशीरा पोलीस आले आणि ज्याच्यावर आम्हाला शंका आहे त्याला पकडण्यात काही इंटरेस्ट दाखवला नाही. काही परिवारांनी गुंड आरोपीला थेट गोळी मारण्याची मागणी केली.
या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि आरोपीला पकडण्यासाठी टीम तयार केल्या. छापेमारी करत रफीक चांडीओला एका झुडपातून पकडण्याच्या प्रयत्न करण्यात आला. पण यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही त्याच्यावर फायरिंग केली आणि त्याचा खेळ खल्लास केला.
एसएसपी डॉ. इमरान खान म्हणाले की आरोपी रफीक चांडीओ एक सराईत गुन्हेगार आहे. तो गेल्या १० वर्षांपासून लूटमार, प्रॉपर्टीवर ताबा मिळवणे असे गुन्हे करतो. याआधीही तो तुरूंगात गेला होता. पाकिस्तानात घडलेली अशाप्रकारची क्रूर घटना पहिली नाही. याआधी २०१९ मध्ये कराचीमध्येही अशी घटना घडली होती. तेव्हा महिलेचा मृतदेह बाहेर काढून रेप करण्यात आला होता.