शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

धक्कादायक! वादातून वलगाव येथे चाकूने भोसकून इसमाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 8:36 PM

पोलीस सूत्रांनुसार, गोवर्धन काशीनाथ कटकतलवारे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ठळक मुद्देसिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून वलगाव येथील भीमनगरात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एका इसमाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.

अमरावती : सहा वर्षांपासून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून वलगाव येथील भीमनगरात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एका इसमाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. 

पोलीस सूत्रांनुसार, गोवर्धन काशीनाथ कटकतलवारे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात नितीन रामदास कटकतलवारे (३७, रा. भीमनगर, वलगाव) यास वलगाव पोलिसांनी अटक केली. नितीनसह पोलिसांनी राहुल सुरेश तायडे (३२), संदीप प्रभाकर सोनवणे (२८), सागर विजय तायडे (२८), मंगेश अरुण वाडेकर (३३), अरविंद सूर्यभान पळसपगार (४७), छोटू आदित्य रवि तलवारे (२०), राहुल दुर्योधन जाटे (३७, सर्व रा. भीमनगर, वलगाव) अशा आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. मृत गोवर्धनची पत्नी प्रतिभा कटकतलवारे (३७) यांनी वलगाव ठाण्यात तक्रार दिली.

सहा वर्षांपासून काँक्रीट रस्ता बांधकामाचा वाद व गोवर्धनच्या पत्नीची छेडखानी यावरून वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास प्रतिभा व नितीन यांची आई या दोघींमध्ये पुन्हा क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. त्या प्रकरणात दोन्ही गटांनी वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरण चौकशीमध्ये ठेवले. रात्री गावात गेल्यानंतर गोवर्धन यांच्या दुचाकीवरून प्रतिभा व त्यांची सासू खाली उतरून विजय शेंडे यांच्या घरासमोर आल्या. त्याचवेळी काहींनी चिथावणीखोर वक्तव्य करून गोवर्धन यांना गाठले. नितीनने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. काहींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने वार केले. गंभीर जखमी गोवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला. खून झाल्याचे कळताच नितीन वगळता उर्वरित सातही साथीदार पसार झाले. नितीनला तासाभरात वलगाव पोलिसांनी अटक केली. कलम ३०२, १४७, १४८, १४९, २९४ सह कलम ४, २५ आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला.

 

ब-याच दिवसांपासून सुरू असलेला वाद तक्रारीनंतरही संपत नव्हता. खुनानंतर वेळीच दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. उर्वरित फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. - आसाराम चोरमले, पोलीस  निरीक्षक, वलगाव ठाणे

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसAmravatiअमरावती