नालासोपारा : नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २४ ते २९ एप्रिलदरम्यान कर्नाटक राज्यात घडली आहे. पीडित अभिनेत्री तरुणीने शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीच्या बहिणीला आरोपी महासुबेर परिद याने दारूमधून गुंगीकारक पदार्थ पाजून अभिनेत्रीसोबत जबरदस्तीने अत्याचार करून अश्लील चाळे केले. नंतर तिच्या बहिणीवरही जबरदस्तीने अत्याचार केले. आरोपी रमेश याने दोन्ही बहिणींचे हात धरून स्वतःजवळ ओढून अश्लील चाळे करून मनात लज्जा निर्माण केली. तर, आरोपी सुधीरकुमार चंद्रशेखर, अभिनव विख्यात, जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींना अर्धनग्न कपडे परिधान करण्यास सांगून त्याचे व्हिडीओ शूटिंग करून अश्लील काम करण्यास भाग पाडले. ते करण्यास नकार दिल्यावर पाचही आरोपींनी दोन्ही बहिणींना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या घटनेमुळे नालासोपारा शहरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! अभिनेत्रीसह बहिणीवर केला बलात्कार; वालीवला पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:38 AM