Crime News : मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयच्या वापरामुळे अनेक कामे सोपी झाली असून वेळेचीही बचत होते. मात्र एआयचा दुरुपयोग करण्याचेही प्रमाण वाढत असून काही विकृतांकडून याचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. असाच एक प्रकार समोर आला असून शाळेतील काही विद्यार्थ्यांनी एआयचा वापर करत आपल्या वर्गातील मुलींचे न्यूड फोटो बनवल्याची घटना घडली आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील मुलींचे काही विद्यार्थ्यांनी एआयच्या माध्यमातून न्यूड फोटो बनवले. तसेच हे फोटो स्नॅपचॅट या अॅपवर शेअर करण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलींनी याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीनंतर आरोपींना अटकही करण्यात आली. मात्र याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा मिळाली नसल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी विद्यार्थी आता पुन्हा शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली असून आरोपी विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागल्याने आता पालकांनी संताप व्यक्त केला आहे.