शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 12:56 PM

या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (३०) याला पॉक्सो तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली.

ठळक मुद्देचेंबूरच्या नामांकित शाळेत हा प्रकार घडला. गोवंडी येथील रहिवासी असलेला रमेश या शाळेत शिपाई आहे.बुधवारी तक्रारदार यांचा मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुरुषांच्या शौचालयाकडे गेला.

मुंबई - शाळेच्या शौचालयातच शिपायाने शिक्षिकेच्या ७ वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (३०) याला पॉक्सो तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली.चेंबूरच्या नामांकित शाळेत हा प्रकार घडला. गोवंडी येथील रहिवासी असलेला रमेश या शाळेत शिपाई आहे. तक्रारदार याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचा सात वर्षांचा मुलगाही याच शाळेत दुसरी इयत्तेत शिकतो. बुधवारी तक्रारदार यांचा मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुरुषांच्या शौचालयाकडे गेला. रमेशची वाईट नजर त्याच्यावर पडली. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत, रमेश त्याच्या मागे गेला आणि शौचालयात त्याने त्याच्यासोबत अश्लील चाळे केले.मुलाने रडण्यास सुरुवात करताच, रमेशने त्याला दम दिला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने मुलाला दिली. मात्र, मुलाने रडतरडत आईकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार आईने बुधवारी रात्री चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिपायाविरुद्ध पॉक्सो, धमकाविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाSchoolशाळाTeacherशिक्षकSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस