बुलंदशहर : सरकारी नोकरी मिळण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. वशिला, लाच आदी क्लुप्त्या वापरल्या जातात. मात्र, बुलंदशहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांची सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मुलानेच आईच्या मदतीने त्याच्या वडिलांची हत्या केली आहे.
अहमदनगर गावाचे 59 वर्षांचे तेजराम यांची त्यांची पत्नी आणि मुलाने संगनमताने हत्या केली आहे. एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी मंगळवारी या प्रकरणाची माहिती दिली. हत्येचे कारण सरकारी नोकरी आणि पेन्शन असल्याचे सांगण्यात आले. धक्कादायक म्हणजे तेजराम जेवत असताना त्याच्या पत्नीने कुऱ्हाडीने त्याचा हात तोडला. यानंतर मुलाने त्याचे मुंडके उडविले. यानंतर मृतदेह पिशवीत भरण्यासाठी तिसरा तुकडा करण्यात आला. यानंतर गावातील कचऱ्यामध्ये हे तुकडे फेकून देण्यात आले.
तेजराम हे माध्यमिक विद्यालयामध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. पुढच्याच वर्षी ते निवृत्त होणार होते. रविवारी त्याचा मृतदेहाचे तुकडे सापडले होते. तेजराम यांची पत्नी मेमवती आणि पुमला कपिल यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. चौकशीवेळी पोलिसांनी त्यांच्याकडून जे ऐकले ते अंगावर शहारे आणणारे होते.
तेजराम शनिवारी रात्री जेवन जेवत होते. याचवेळी मेमवती हिने पाठीमागून हल्ला करत त्यांचा एक हात तोडला. वेदनेने विव्हळत तेजराम तेथेच पडले. यानंतर मुलाने त्यांचे मुंडके वेगळे केले. एवढे करूनही हा निर्दयी मुलगा थांबला नाही. त्याने मृतदेह फेकण्यासाठी सोपा व्हावा यासाठी तेजरामच्या शरिराचे दोन तुकडे केले. हे तुकडे पॅक करून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकले. मात्र, रविवारी सकाळी गावकऱ्यांना कचऱ्यामध्ये मृतदेह असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.