फ्लॉरिडा : चोरी करण्यासाठी अनेक विविध पद्धती अवलंबल्या जातात. सध्या सगळीकडे कडेकोट सुरक्षा असते, तसंच तंत्रज्ञानाच्या मदतीनेही सुरक्षाव्यवस्था कडक केलेली असते. त्यामुळे हा सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धुळ फेकत चोरी करणं कठीण आहे. पण जगभरातील अट्टल चोर चोरीच्या नवनव्या पद्धती अवलंबताना दिसतात. चोरीतून जितका पैसा मिळणार आहे, त्यासाठी तेवढंच भांडवलही तयार करतात.अशीच एक पद्धत अमेरिकेतील फ्लॉरिडा शहरात चोरांकडून वापरण्यात आली. त्या चोरांना ७ लाखांचं घड्याळ चोरायचं होतं त्यामुळे त्यांनी जरा हटके पद्धतीने लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि तीच संधी साधून आपला चोरीचा प्रयत्न यशस्वी केलाय.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील फ्लॉरिडा शहरातील सॉग्रास मिल्स मॉलमध्ये अचानक जोराचा आवाज आला. हा आवाज इतका भयानक होता की लोकांना वाटलं की इथं गोळीबार सुरू झालाय. त्याचवेळेस दोन व्यक्ती धावताना नजर आल्या, ज्यांच्या हातात ते ७ लाखांची रॉलेक्स कंपनीचं घड्याळ होतं. दोन चोर सॉग्रास मिल्स मॉलच्या जेल्स ज्वेलरी स्टोरमध्ये उभे होते. तिथे ते घड्याळं पाहत होते. त्या दोन चोरांपैकी एकाने ते रॉलेक्सचं घड्याळ घालून बघितलं, ज्याची किंमत ७ लाख होती. ते त्या घड्याळाचं निरिक्षण करत असतानाच एक अचानक मोठा आवाज आला. या आवाजाला घाबरताच त्यांनी दुकानातून पळ काढला. सनराईज पोलिसांनी या बाबत अधिक चौकशी केली असता हा चोरांचा डाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. त्यांनी त्याठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाहा व्हिडीयो -
चोरीचे अनेक प्रकार आपण याआधीही पाहिले आहेत. मोठ-मोठ्या बँकेत दरोडे टाकण्यासाठी चोरांनी बँकेच्या भुयार तयार करण्यापासून ते सुरूंग लावण्यापर्यंत सारं काही आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक क्षेत्र ज्याप्रमाणे अद्ययावत झाली आहेत, त्याचप्रमाणे कुमार्गाने काम करणारी टोळीही अद्ययावत होताना दिसतेय. त्यामुळे अशा सराईत चोरांवर वचक ठेवण्याचं मोठं आव्हानच पोलीस आणि सुरक्षारक्षकांवर आहे.