ठळक मुद्देदिव्या म्हात्रे (20) असे तरुणीचे नाव कालच लग्न ठरलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली.
नवी मुंबई - लग्न ठरलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बोनकोडे येथे ही घटना घडली आहे. दिव्या म्हात्रे (20) असे तरुणीचे नाव असून घरात एकटीच असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास गळफास घेतला. कालच लग्न ठरलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. दोन दिवसातली शहरातली अशा प्रकारची दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.